देशाच्या सर्व सीमा सुरक्षित : राजनाथ   

नवी दिल्ली : देशाच्या सर्व सीमा आणि भारत पूर्णपणे सुरक्षित आहे. देशातील जनतेला सशस्त्र दलांवर पूर्ण विश्वास असला पाहिजे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी सांगितले. एका वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात ते बोलत होते. अग्निवीर योजनेबाबत संरक्षण मंत्री म्हणाले, लष्करात तरुण असले पाहिजे. लष्करात ३० ते ५० वयोगटातील जवान आहेत. ते पूर्ण जबाबदारीने काम करत आहेत. १८ ते २० वर्षे या वयोगटातील तरुण अग्निवीरच्या माध्यमातून लष्करात जेव्हा भरती होतात तेव्हा त्यांच्या धोका पत्करण्याचे धैर्य जास्त असते. आज तंत्रज्ञानाचे युग आहे. त्यामुळे अशा जवानांची आम्ही अग्निवीरच्या माध्यमातून भरती करत आहोत. त्यांच्या भविष्यावर आम्ही कोणताही अन्याय होऊ देणार नाही, असेही राजनाथ म्हणाले. काही गोष्टी जाहीरपणे बोलता येत नाहीत. कारण, त्या धोरणात्मक आणि व्यूहरचनेचा भाग असतात. त्यामुळे मी बोलणे टाळतो. आपल्या जवानांना अनेक प्रकारचे शौर्याचे काम करताना पाहिले आहे, असेही राजनाथ म्हणाले.

Related Articles