उमेदवार निवडीसाठी काँग्रेसची रविवारी बैठक   

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने आतापर्यंत २०८ उमेदवार जाहीर केले आहेत. उर्वरित उमेदवारांबाबत चर्चा करण्यासाठी आणि अंतिम निर्णय घेण्यासाठी काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची (सीईसी) बैठक येत्या रविवारी (३१ मार्च रोजी) होण्याची दाट शक्यता आहे.काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांसह अन्य सदस्य बैठकीस उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
 
या बैठकीत महाराष्ट्र आणि दिल्लीतील उमेदवारांबाबत चर्चा केली जाणार आहे. दिल्लीत काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची आघाडी आहे. हे दोन्ही पक्ष ‘इंडिया’ आघाडीचा भाग आहेत. पण, पंजाबमध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्र लढत आहेत. याचप्रमाणे तृणमूल काँग्रेस ‘इंडिया’चा भाग असूनदेखील पश्चिम बंगालमध्ये तृणमूल आणि काँग्रेस स्वतंत्रपणे लढत आहेत.महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती अशी लढत होणार आहे. मात्र, जागावाटपावरुन प्रचंड चढाओढ सुरू आहे. काँग्रेसने आतापर्यंत २०८ उमेदवारांची घोषणा केली आहे. तर, भाजपने ४०० हून अधिक उमेदवार जाहीर केले आहेत.लोकसभेच्या ५४३ जागांसाठी १९ एप्रिलपासून सात टप्प्यांत मतदान होणार आहे. तर, ४ जून रोजी मतमोजणीनंतर निकाल जाहीर होणार आहे.

Related Articles