संजीव भट्ट यांना २० वर्षांचा तुरुंगवास   

पालनपूर : माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट यांना १९९६ मधील एनडीपीएस प्रकरणात येथील सत्र न्यायालयाने गुरुवारी २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. तसेच, दोन लाखांचा दंडही ठोठावला. १९९६ मध्ये गुजरातच्या पानलपूर येथील हॉटेल लाजवंतीमधून पोलिसांनी अमली पदार्थ जप्त केले होते. तसेच, या प्रकरणात राजस्तानमधील एका वकिलाचे नाव गोवण्यात आले होते. भट्ट त्यावेळी बनासकांठा पोलिस अधीक्षक होते या प्रकरणात न्यायालयाने भट्ट यांना नुकतेच दोषी ठरविले होते. भट्ट यांना सलग २० वर्षांची शिक्षा भोगावी लागेल, असे न्यायालयाने सांगितले. याचा अर्थ जामनगर प्रकरणातील जन्मठेपेची शिक्षा संपल्यानंतर सुरू होईल. भट्ट यांना २०१५ मध्ये पोलिस दलातून काढून टाकण्यात आले होते तर २०१८ पासून ते तुरुंगात आहेत. अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश जे एन ठक्कर यांनी बुधवारी भट्ट यांना ‘एनडीपीएस’अंतर्गत दोषी ठरविले होते. तर, काल न्यायलायाने  शिक्षा सुनावण्यात आली. दोन लाखांचा दंड भरला नाही तर, आणखी एक वर्ष तुरुंगवास भोगावा लागेल, असे न्यायाधीशांनी त्यांच्या आदेशात म्हटले आहे. 

Related Articles