आणखी एका परीक्षार्थीने संपविले जीवन   

कोटामधील घटना; तीन महिन्यांत सात आत्महत्या

 
कोटा : वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या ‘नीट’ परीक्षेची तयारी करणार्‍या एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. कोट्यात जानेवारीपासून सात परीक्षार्थींनी आपले जीवन संपविले आहे. सोम्या कुर्मी हिने बुधवारी रात्री उशिरा पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली, असे पोलिस अधीक्षक राजेश दर्जी यांनी गुरूवारी सांगितले.
 
एक दिवस आधी महमद उरुज (वय-२०) हा परीक्षार्थी विज्ञान नगर येथील पीजीत मृतावस्थेत आढळला होता.सोम्याने काल दरवाजा उघडला नाही. त्यावेळी तिच्या मित्रांनी दरवाजा तोडला. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. एक वर्षापासून ती येथे ‘नीट’ची तयारी करत होती. महिन्याभरापूर्वीच ती महावीर नगरमधून या ठिकाणी राहण्यासाठी आली होती. पोलिसांनी एक चिठ्ठी सापडली आहे. मात्र, अधिक तपशील समजू शकला नाही. कोटा शहरात जानेवारीपासून ७ परीक्षार्थींनी आत्महत्या केल्या आहेत. तर, २०२३ मध्ये २६ परीक्षार्थींनी आपले जीवन संपविले होते.
 

Related Articles