नकुल नाथ यांच्याकडे ७०० कोटींची मालमत्ता   

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील काँग्रेसचे एकमेव खासदार आणि छिंदवाडाचे उमेदवार नकुल नाथ यांच्याकडे ७०० कोटींची मालमत्ता आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या नावावर एकही मोटार नाही.नकुल नाथ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार मागच्या पाच वर्षांत नकुल नाथ यांच्या संपत्तीत ४० कोटींची वाढ झाली. नकुल नाथ यांच्याकडे ६४९.५१ कोटींची जंगम मालमत्ता तर ४८.०७ कोटींची स्थावर मालमत्ता आहे. 
 
असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआ) नुसार, नकुल नाथ यांची २०१९ मध्ये ६६० कोटींची मालमत्ता होती. त्यावेळी ४७५ कोट्यधीश उमेदवार रिंगणात होते. त्यात नकुल नाथ हे सर्वांत श्रींमत उमेदवार होते.मध्य प्रदेशाल पहिल्या टप्प्यात म्हणजे १९ एप्रिल रोजी लोकसभेच्या २९ जागांसाठी मतदान होणार आहे. आतापर्यंत ११३ उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. 
 
नकुल नाथ हे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ यांचे चिरंजीव आहेत. २०१९ मध्ये मध्य प्रदेशातून नकुलनाथ हे एकमेव काँग्रेस खासदार निवडून आले होते. भाजपने २९ पैकी २८ जागा जिंकल्या होत्या.विधानसभा निवडणुकीत कमलनाथ यांनी १३४ कोटींची मालमत्ता जाहीर केली होती.भाजपने नकुल नाथ यांच्या विरोधात विवेक साहू यांना उमेदवारी दिली आहे. १९५२ पासून काही अपवाद वगळता छिंदवाडा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात राहिला आहे. कमलनाथ यांनी विक्रमी नऊ वेळा ही जागा जिंकली होती.
 

Related Articles