पंजाब आणि दिल्लीत ‘आप’ फोडण्याचा प्रयत्न : भारद्वाज   

नवी दिल्ली : पंजाब आणि दिल्लीत आम आदमी पक्षाला पराभूत करता येणार नाही, हे भाजपला माहीत आहे. त्यामुळेच ‘आप’चे खासदार आणि आमदार फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी म्हटले आहे.भारद्वाज म्हणाले, भाजपला कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आपल्या जाळ्यात अडकवायचे आहे. त्याची जबाबदारी ईडीवर आहे. केजरीवाल यांना खोट्या खटल्यात अडकवून तुरूंगात पाठवणे. त्यानंतर दिल्ली आणि पंजाबमधील आपच्या खासदार, आमदारांना भाजपामध्ये आणून पक्ष फोडायचा भाजपचा प्रयत्न आहे. आप हा पंजाबमधील सर्वात मोठा पक्ष आहे. काँग्रेस-अकाली दल दुसर्‍या आणि तिसर्‍या क्रमांकावर आहे. पंजाबमध्ये भाजपची अवस्था एवढी वाईट असताना आपचे नेते का फोडत आहेत?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.  
 
आमचे जालंधरचे खासदार रिंकू यांचा कार्यकाळ संपला आहे. आता त्यांना निवडणूक लढवायची होती. जालंधरमध्ये भाजप चौथ्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत चौथ्या क्रमांकावर येण्यासाठी एक खासदार भाजपामध्ये का जाईल? आमदारांना फोनवरून भाजपमध्ये सामील होण्याचे आमिष दाखवण्यात येत आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये आमचे सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन लोटस चालवले जात आहे, असेही ते म्हणाले.
 

Related Articles