हस्तक्षेप नाही, केवळ लक्ष ठेवून आहोत   

केजरीवाल प्रकरणावर अमेरिकेचे स्पष्टीकरण

 
वॉशिंग्टन : अरविंद केजरीवाल अटक प्रकरणावर अमेरिका कोणताही हस्तक्षेप करत नाही. केवळ लक्ष ठेवून आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी स्पष्ट केले आहे. केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळा प्रकरणात ईडीने अटक केली आहे.  या प्रकरणावर आम्ही लक्ष ठेवून आहे. या प्रकरणाची निष्पक्ष आणि पारदर्शकतेने चौकशी व्हावी, अशी आमची इच्छा आहे, असे अमेरिकेने म्हटले होते. त्यानंतर अमेरिकेने या प्रकरणात नाक खुपसू नये, हा प्रकरण भारताच्या अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगत भारताने अमेरिकेला फटकारले होते. यापूर्वी, परराष्ट्र मंत्रालयाने अमेरिकेच्या कार्यवाहक ग्लोरिया बर्बेना यांना अमेरिकेने केजरीवाल यांच्या अटकेवर टिप्पणी केल्याबद्दल आणि देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप केल्याबद्दल समन्स बजावले होते. त्यांची ४० मिनिटे चौकशी ही करण्यात आली होती.
 

Related Articles