गांधींच्या वेशभूषेत खरेदी केला उमेदवारी अर्ज   

वर्धा : वर्धा जिल्ह्यात चक्क महात्मा गांधी यांची वेशभूषा करत प्रकाश उर्फ टिटू मोटवानी यांनी लोकसभेचा उमेदवारी अर्ज विकत घेतला. त्यावेळी त्यांनी अनेकांचे लक्ष वेधले.मोटवानी यांनी गुरूवारी वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज विकत घेतला. त्यावेळी मोटवानी म्हणाले, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी अजूनही सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवू शकले नाहीत. पण मी निवडून आल्यास एक वेगळी समस्या सोडवणार आहे. जिल्ह्यातील जनता डासांनी त्रस्त आहे, त्या  डासांचा मी नायनाट करणार आहे.
 
६१ वर्षीय मोटवानी हे वर्धा जिल्ह्याच्या आर्वी येथील राष्ट्रसंत वॉर्डाचे रहिवासी आहेत. त्यांच्या घराजवळ नगरपालिकेचा नाला आहे. त्यामुळे तेथे डासांचा त्रास  होत असतो. मोटवानी यांचा वॉर्ड डासांमुळे त्रस्त झाले आहे. त्यामुळे त्यांनी थेट लोकसभा निवडणुकीत उतरत डासांचा नायनाट करण्याचा चंग बांधला आहे. आर्वीचा गांधी म्हणून त्यांची ओळख आहे.  दोन एप्रिलला ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 

Related Articles