मंगळुरूमध्ये मत्स्य प्रक्रिया केंद्र जळून खाक   

बंगळुरू : मंगळुरूच्या बैकमपाडी औद्योगिक परिसरातील मत्स्य प्रक्रिया केंद्राला गुरूवारी पहाटे पाचच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण केंद्र जळून खाक झाले. 
बैकमपाडी औद्योगिक परिसरात शिहर एंटरप्रायजेस कंपनीचे मत्स्य प्रक्रिया केंद्र आहे. या केंद्राला गुरूवारी पहाटेच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच स्थानिकांनी अग्निशमन दलाला यासंदर्भात माहिती दिली. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत आगीने उग्र रूप धारण केले होते. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत आग कारखान्याच्या इतर भागात पसरली होती. अग्निशमन दलाने काही तासांत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत संपूर्ण केंद्र आगीत जळून खाक झाले होते. प्राथमिक तपासात शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून, या घटनेचा कसून तपास करण्यात येत आहे. 
 

Related Articles