अभिनेता गोविंदा शिंदे यांच्या शिवसेनेत   

मुंबई, (प्रतिनिधी) : चित्रपट अभिनेता गोविंदा आहुजा याने अखेर गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब भवन येथे गोविंदा यांना पक्षात प्रवेश दिला. गोविंदा वायव्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढविणार अशी शक्यता आहे. ठाकरे गटाकडून या जागेवर अमोल कीर्तिकर निवडणूक लढविणार आहेत. दरम्यान, गोविंदा यांच्यापाठोपाठ बॉलीवूडमधील करिश्मा आणि करिना कपूर या भगिनीदेखील मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा आहे. मागच्या चौदा वर्षांच्या वनवासानंतर आपण पुन्हा एकदा राजकारणात प्रवेश करत असल्याची प्रतिक्रिया गोविंदा यांनी दिली आहे.
 
गोविंदा शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. अखेर काल गोविंदा यांनी बाळासाहेब भवन येथे आयोजित कार्यक्रमात शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदा यांना पक्षात प्रवेश दिला. 

Related Articles