महाबळेश्वरमध्ये तीन दिवसांत दोघांची आत्महत्या   

सातारा, (प्रतिनिधी) : बालाजी मुरली गोडबोले (वय २७ रा. वडगाव ता.पाथरी जि. परभणी) या युवकाने वेण्णालेक जवळ, तर अब्दुल खादर हुल्लूर (वय ४२ रा. गोडवली ता. महाबळेश्वर) या व्यक्तीने जामा मस्जीदमधील बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. सलग तीन दिवसांत घडलेल्या या दोन्ही घटनांची नोंद महाबळेश्वर पोलिस ठाण्यात झाली आहे. 
 
मस्जीद रोडवर असलेल्या जामा मस्जीदच्या बाथरूममध्ये २४ तारखेला दुपारी अब्दुल खादर साहेब हुल्लूरने नायलॉन दोरीच्या मदतीने खिडकीच्या जाळीला गळफास घेऊन आत्महत्या केली. याच दिवशी दुपारी ४ च्या दरम्यान या स्वच्छतागृहामधील लाईट चालू असल्याचे लक्षात आले. परंतु दरवाजा आतून बंद होता आणि आतून कोणाचा आवाज येत नसल्याने तेथील लोकांनी स्वच्छतागृहाचा दरवाजा फोडला असता आतमध्ये नायलॉन दोरीला गळफास घेतलेल्या स्थितीत अब्दुल खादर हुल्लूर हे आढळून आले. याबाबत त्यांच्या नातेवाइकांना माहिती देण्यात आली. त्यांच्या नातेवाइकांनी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती दिली.
 
वेण्णालेकजवळ असलेल्या जी.व्ही. गार्डन हॉटेलच्या बाहेर असलेल्या पाण्याच्या टाकीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे काही लोकांनी पाहिले. त्यांनी तातडीने याबाबत महाबळेश्वर पोलिसांना दिली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तरुणाला खाली घेण्यात आले असता तो मृत्यू झाल्याचे दिसून आले. त्या तरुणाच्या खिशात असलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधला असता युवकाचे नाव बालाजी मुरली गोडबोले (वय २७, सध्या रा. मुंबई) असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या तरूणाने नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, अशी नोंद महाबळेश्वर पोलिसात करण्यात आली.
 

Related Articles