भाजपमध्ये अंतर्गत धुसफुस   

मोहळ यांच्या उमेदवारीवर काकडे नाराज
 
पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून भाजपने मुरलीधर मोहोळांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपमध्ये सुरू झालेली अंतर्गत धुसफुस अद्याप सुरूच आहे. त्यांच्या उमेदवारीवर भाजचेच नेते संजय काकडे यांनी नाराजी व्यक्त केली असून, पुण्याच्या उमेदवारीवर मी शंभर टक्के नाराज आहे. पक्षाकडून बी फॉर्म देईपर्यंत मी लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे काकडे यांनी स्पष्ट केले.
 
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री, भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी संजय काकडे यांची बुधवारी त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर गुरूवारी काकडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले असता त्यांनी माझी भेट घेतली. महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात लढत झाल्यास मोहोळ यांना किती मते पडतील, विविध पक्षांची मतविभागणी कोणाच्या पथ्थ्यावर पडेल आणि पुणे शहरात काय झाले पाहिजे यासह पुण्याच्या सहा विनधानसभा मतदारसंघ आणि प्रभागानुसार सर्व परिस्थिती चव्हाण यांच्यासमोर मांडल्याचे काकडे यांनी सांगितले.
 
काकडे म्हणाले, मी उमेदीची दहा वर्षे पक्षाला दिली आहेत. पुणेकरांपर्यंत मी जनतेपर्यंत पोहचलो आहे. भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारीवर मी शंभर टक्के नाराज आहे. पुणे लोकसभेसाठी मी इच्छुक आहे आणि माझी नाराजी ही नैसर्गिक आहे. मात्र मी उमेदवार बदलाची कुठलीही मागणी करणार नाही. मी इच्छुक होतो, आजही आहे. 
 

Related Articles