तपमानाने केली पुणेकरांची कोंडी   

पुणे : वातावरणातील बदलामुळे शहर व परिसरातील तपमानात सातत्याने वाढ होत आहे. वाढलेल्या तपमानात दुपारी घराबाहेर पडताना पुणेकरांना चार वेळा विचार करावा लागत आहे. त्यामुळे उकाडा आणि उन्हाच्या झळा सहन करण्यापेक्षा घरात, तसेच कार्यालयात थांबणेच पुणेकर पसंत करत आहेत. शहरात गुरूवारी ३९ अंश कमाल, तर २०.९ अंश किमान तपमानाची नोंद झाली.पुणेकरांनी सलग चौथ्या दिवशी उन्हाच्या तीव्र झळा अनुभवल्या. त्यात दुपारी उकाड्याची भर पडत आहे. वाढलेले ऊन आणि उकाड्यापासून दिलासा मिळविण्यासाठी पुणेकरांना फॅन, कुलर आणि एसीचा वापर करावा लागत आहे. तापलेल्या वातावरणामुळे नागरिकांनी दुपारी कारणाशिवाय घराबाहेर पडणे टाळले. उपनगरांमध्ये तपमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे नोंदवला गेला.
 
वाढलेल्या तपमानामुळे शहरात रात्री जाणवणारा गारवाही आता ओसरला आहे. सकाळी दहा वाजल्यापासूनच उन्हाची तीव्रता जाणवत आहे. पुढील दोन दिवस शहरातील तपमान स्थिर राहणार असल्याचा अंदाज आहे. आज (शुक्रवार) नंतर दुपारनंतर आकाश अंशत: ढगाळ राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. शहरात आणि आणि उद्या सायंकाळी आकाश अंशत: ढगाळ राहणार असल्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. 
 

अकोल्यात उच्चांकी तपमान 

 
राज्यातील बहुतांश भागात कमाल आणि किमान तपमानात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात काल अकोला येथे उचांकी ४२.८ अंश, तर पुणे येथे नीचांकी २०.९ अंश किमान तपमानाची नोंद झाली. मागील २४ तासात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकण, गोवा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे होते. विदर्भात काही ठिकाणी कमाल तपमानात लक्षणीय वाढ झाली. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात कमाल तपमानात किंचित वाढ झाली. 
 

Related Articles