नदीपात्रात भराव टाकणारी वाहने जप्त   

एक लाख १५ हजार दंड वसूल

 
पिंपरी : पिंपरी चिंचवड मनपा कार्यक्षेत्राच्या विविध भागांतून दररोज ट्रक, ट्रॅक्टर, डंपर, टेम्पो- ४०७, आर.एम.सी. प्लॅन्टच्या मिक्सर गाड्या अशी वाहने नदीच्या कडेला राडारोडा टाकताना आढळली. त्यामुळे हवा प्रदूषण होत असल्याबाबतची तक्रार पर्यावरण विभागास प्राप्त झाली. त्यानंतर पर्यावरण विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून सापळा रचून या सर्व वाहनचालकांवर दिनांक ८ ते दिनांक २१ मार्च पर्यंत कारवाई केली. नदीपात्रात भराव करणारी वाहने जप्त करून एक लाख १५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे  (१) शिवा राठोड (वाहन क्र. के.ए.३३/टी.बी. २३२२), (२) श्री. उमेश बारणे (वाहन क्र.एम.एच.१४/जे.एल. ९०८५), (३) वेदांत देसाई (वाहन क्र.के.ए.३३/के.ए.२१०५), (४) आर.डी.वाघोले (वाहन क्र.एम.एच.१४/डी.एम.६४३२, एम.एच.१२/टी.एल.०८७२), (५). तेजस उक्के (वाहन क्र.एम.एच.२०/सी.आर.२१९१०/एम.एच.१४/एल.ए.८३२८), (६)  प्रकाश चौधरी (वाहन क्र. एम.एच.१२/क्यु.डब्ल्यु. ११४१), (७)  कांतीलाल खिरु पवार (वाहन क्र. एम.एच.१४/बी.एम. ९८२) अशी ९ वाहने पकडून एक लाख १५ हजार रुपये  दंड वसूल करणेत आला आहे.
 
पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक अमोल गोरखे, मल्टिपर्पज वर्कर गोरक्षनाथ करपे, ज्युनियर इंजिनियर स्वप्निल पाटील, केमिस्ट . पुष्पराज भागवत, यांनी ही कारवाई केली. त्यासाठी पर्यावरण पथक प्रदीप महाले, जगन्नाथ काटे, बाबासाहेब ढोकळे, तसेच एमएसएफ व मेस्को जवानांचे पथक यांची मदत घेवून कारवाई करण्यात आली आहे.
 
यापुढेही अशा प्रकारे नदी / नाल्यांच्या बाजूने राडारोडा टाकत असल्याचे निदर्शनास आल्यास किंवा मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण करत असल्याचे निदर्शनास आल्यास फौजदारी स्वरुपाची कारवाई करणेत येईल, असा इशारा मनपाच्या पर्यावरण विभागामार्फत संजय कुलकर्णी सह शहर अभियंता, पर्यावरण पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी दिला आहे.
 

Related Articles