मुकेशकुमार, कुलदीप यादवची शानदार गोलंदाजी   

राजस्तान :  सवाई मानसिंग स्टेडियमवर काल राजस्तान रॉयल्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगला. या सामन्यात राजस्तान रॉयल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत १८५ धावा केल्या. यावेळी ५ महत्वपुर्ण फलंदाज बाद झाले. दिल्लीच्या मुकेशकुमार याने १ बळी, तर खलील अहमद याने १ बळी टिपला. तर अनरीच नॉर्टजे याने १ फलंदाज बाद केला. अक्सर पटेल याला १ बळी आणि कुलदीप यादवला १ बळी मिळाला. 
 
यामध्ये राजस्तानच्या रियान पराग याने ८४ धावा केल्या. संजू सॅमसन याने १५ धावा तर जोश बटलर याने ११ धावा केल्या. जैस्वाल याने ५ धावा केल्या. अश्विन याने २९ धावा करत संघाला दीडशेपार नेले. ध्रुव ज्युरेल याने २० धावा तर शिमरॉन हॅटमायर याने १४ धावा केल्या.  आयपीएलच्या ९ व्या सामन्यात संजू सॅमसन आणि ऋषभ पंत हे दोन युवा यष्टीरक्षक  एकमेकांसमोर उभे ठाकले होते. विशेष म्हणजे दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत भीषण अपघातानंतर नुकताच व्यावसायिक क्रिकेटमध्ये परतला आहे. पंतने काल दिल्लीकडून आपला १०० वा आयपीएल सामना खेळला. दिल्ली कॅपिटल्सकडून १०० वा सामना खेळणारा ऋषभ पंत हा पहिला खेळाडू ठरला 
 
ऋषभ पंतचा डिसेंबर २०२२ मध्ये अपघात झाला होता. त्यावेळी त्याच्या कारने पेट देखील घेतला. पंत या अपघातातून वाचला. मात्र त्याच्या गुडघ्या जबर दुखापत झाल्याने त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. 
 
जवळपास १४ महिने क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतर आता पंत क्रिकेटच्या मैदानावर उतरला आहे. तो यष्टीरक्षण आणि दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व देखील करत आहे. ऋषभ पंतने २०१६ मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्यास सुरूवात केली होती. त्याने दिल्लीकडूनच आयपीएल पदार्पण केले होते. 
 

Related Articles