रोहित शर्माने घेतली कर्णधार हार्दीक पांड्याची शाळा   

मुंबई : आयपीएल २०२४ च्या आठव्या सामन्यात मुंबई इंडियन्सला हैदराबादविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. हैदराबादने मुंबईचा ३१ धावांनी पराभव केला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा हा सलग दुसरा पराभव आहे. मुंबईच्या या पराभवानंतर चाहते हार्दिक पांड्याला ट्रोल करत आहे. आणि दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मानेही सामन्यानंतर हार्दिकला फटकारले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हार्दिक पांड्या सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहे. एमआयला याआधी गुजरातविरुद्ध ६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर आता हैदराबादविरुद्ध ३१ धावांनी पराभव पत्करावा लागला आहे.
 
या पराभवानंतर मुंबईचा माजी कर्णधार रोहित शर्मा मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्यावर भडकला आहे. सामन्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रोहित शर्मा आकाश अंबानीशी बोलत असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी तिलक वर्मासह तिथे अन्य खेळाडू पण उपस्थित होते. आणि रोहित शर्मा हार्दिक पांड्याला समजावून सांगत आहे. यावर चाहत्यांचे म्हणणे आहे की, सामन्यादरम्यान हार्दिक कोणाचेही ऐकत नाही. त्यामुळेच मुंबईने सलग २ सामने गमावले आहेत. याच कारणामुळे सामन्यानंतर रोहित शर्मा हार्दिकला सामन्यादरम्यान झालेल्या चुका सांगत आहे.पहिल्या सामन्यात गुजरातविरुद्ध मुंबईचा पराभव झाला, तेव्हाही रोहित शर्मा हार्दिकला समजावताना दिसला. आता पुन्हा एकदा असेच काहीसे पाहायला मिळत आहे.
 
मुंबई आणि हैदराबाद यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी धावांची त्सुनामी आणली होती. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने अवघ्या ३ गडी गमावून २७७ धावा केल्या. ही धावसंख्या आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या आहे. हैदराबादच्या चार फलंदाजांनी झंझावाती खेळी खेळली, त्यामुळे ही धावसंख्या शक्य झाली. लक्ष्य मोठे असले तरी मुंबई इंडियन्सने हार मानली नाही. मुंबईनेही सामना जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावले. मात्र मुंबईला हा सामना जिंकता आला नाही.
 

Related Articles