व्हॉट्सऍप कट्टा   

तुझ्या गोळ्या माझ्या गोळ्या
दोघे मिळुनी घेऊ सगळ्या
कुठली गोळी किती वेळा
लक्षात ठेवूया सार्‍या वेळा॥
 
तुझी पिवळी माझी निळी
गंमत आहे ही सगळी
लिहून ठेवूया गोळी न् गोळी
नाहीतर होईल घोटाळा॥
 
तुझी बीपीची, माझी डायबेटिसची
ही मोठी कॅप्सुल कॅल्शियमची
तुझी जेवणानंतरची, माझी जेवणाआधीची
विसरुन गेलो तर भोगा कळा॥
 
बघून अपुल्या या गोळ्या
हसतील सगळे खळाखळा
येऊ नये त्यांच्यावर ही वेळा
नाहीतर तेही रडतील घळाघळा॥
 

Related Articles