भारतात यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज!   

नवी दिल्ली : जागतिक तपमान वाढीमुळे होणारे हवामान बदल आणि त्याचा इतर गोष्टींवर होणारा विपरीत परिणाम ही सध्या सर्वच देशांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान बदलाचा सर्वात मोठा फटका शेती क्षेत्राला बसत आहे. या संदर्भात नुकताच APEC अर्थात एशियन-पॅसिफिक इकोनॉमिक कोऑपरेशन क्लायमेट सेंटरने या वर्षीचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे. यानुसार भारतात यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज नमूद केला आहे. त्यामुळे बळीराजासाठी ही आनंदाची बाब ठरू शकते. भारतातील शेतकरी वर्गाला काही प्रमाणात दिलासा मिळेल असे वाटते. 
 
APEC ने एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीसाठी जागतिक स्तरावर कुठे कसा व किती पाऊस पडेल? हवामान कसे राहील? या संदर्भात अंदाज वर्तवले आहेत. त्यामध्ये भारतासाठी सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याच्या हवाल्याने 'द हिंदून'ने  दिलेल्या वृत्तामध्येही यंदा मान्सून सरासरीपेक्षा जास्त होईल असे नमूद केले आहे.

अल निनो ते ला निना!

 APEC ने १५ मार्च २०२४ रोजी ENSO अर्थात अल निनो साऊदन्र ऑसायलेशन ही यंत्रणा वापरात आणली असून त्यानुसार एप्रिल ते सप्टेंबर २०२४ या काळात 'ला निना'चा मान्सूनवर प्रभाव दिसून येईल. मार्च ते मे २०२४ दरम्यान देशात अल निनोचा प्रभाव दिसून येईल. त्यानंतर मात्र जून ते सप्टेंबर या काळात ला निनाच्या स्थितीमुळे पावसाच्या प्रमाणावर सकारात्मक परिणाम होताना दिसू शकेल, असे अंदाजही APEC ने वर्तवला आहे.
 

Related Articles