महायुतीत सहभागी होण्यासाठी मनसेची तीन जागांची मागणी   

मुंबई,  (प्रतिनिधी)  : महायुतीत सामील होण्यासाठी मनसेने तीन जागांचा प्रस्ताव दिला आहे. त्यापैकी दोन जागांवर चर्चा सुरु असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली. शिवसेनेत मनसे विलीन होणार अशा चर्चा सुरू आहे. त्याबाबत माझ्यापर्यंत कोणतीही माहिती नसून याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेच सांगू शकतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. गुढीपाडव्याला मनसेचा महामेळावा असणार आहे. या मेळाव्याचा आयोजनाबाबत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना बाळा नांदगावकर यांनी ही माहिती दिली. कालच्या बैठकीत मुंबईतील सर्व मतदारसंघातील विभाग अध्यक्षांसह शाखाप्रमुखांना आमंत्रित करण्यात आले. वरिष्ठ नेते, सरचिटणीस आणि इतर पदाधिकार्‍यांना आमंत्रित करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी विभागनिहाय आणि शाखानिहाय बैठका घेण्याची सूचना केली.

Related Articles