शेअर बाजाराची उसळी   

मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी बुधवारी अनुक्रमे ५२७ आणि ११९ ने वाढला. रिलायन्स इंडस्ट्रिज आणि एचडीएफसी बँकेचे समभाग ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याचे उघड झाले.
 
सेन्सेक्स ७२ हजार ९९६ तर निफ्टी २२ हजार १२३ वर पोहोचला. रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग साडेतीन टक्क्यांनी वाढले. तसेच मारुती, बजाज फायनान्स, टायटन, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, इंडसलँड बँक, महिंद्रा अँड महिंद्रा, लार्सन अँड ट्रुब्रो यांचे समभाग वाढले. विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजी, नेस्ले, टाटा कन्सल्टन्सी आणि टाटा मोटर्सचे समभाग घसरले. आशियातील टोकियो शेअर बाजारात चांगले वातावरण होते. या उलट सेऊल, शांघाय आण हाँगकाँग बाजारातील घसरण पाहायला मिळाली. 

Related Articles