आत्मघातकी हल्ल्याचा तपास तातडीने करा   

चीनची पाकिस्तानला तंबी

 
बीजिंग : पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतात झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात चीनच्या पाच नागरिकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास तातडीने करावा, अशी तंबी खवळलेल्या चीनने पाकिस्तानला दिली आहे. 
 
खैबर पख्तुनख्वा प्रांतात मंगळवारी झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात चीनचे पाच नागरिक ठार झाले होते. त्यामध्ये अभियंते आणि कर्मचार्‍यांचा समावेश होता. चीनचे नागरिक प्रवास करत असलेल्या बसवर स्फोटकांनी भरलेले वाहन दहशतवाद्यांनी धडकवले होते. भीषण स्फोटात त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे चीन खवळला असून  या प्रकरणाची कसून चौकशी करावी आणि दोषींना अटक करावी, असे चीनने पाकिस्तानला सांगितले आहे. चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडोर प्रकल्पाच्या सुरक्षेत वाढ करावी, असे आवाहनही केले आहे. चीनच्या मदतीने प्रांतात जलविद्युत प्रकल्प उभारला जात आहे. तेथे चीनचे नागरिक काम करत होते. २०२१ नंतर दुसर्‍यांचा दहशतवादी हल्ला त्यांच्यावर झाला आहे. दहशतवाद्यांना तातडीने पकडा अशी मागणी आता चीनने केली आहे.
 
चीनच्या प्रकल्पाला दहशतवाद्यांचा धोका
 
चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडोर प्रकल्प (सीपीईसी) चीन राबवत आहे. सुमारे ६० अब्ज डॉलर्सचा खर्चाचा हा प्रकल्प आहे. तेथे हजारोंच्या संख्येने चीनचे कर्मचारी, अभियंते काम करत असल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दहशतवादी तेथेही वारंवार हल्ले करत आले आहेत. त्यामुळे प्रकल्प आता संकटात सापडला आहे. प्रामुख्याने बलुचिस्तानातील स्वातंत्र्यप्रेमी त्याच्यावर हल्ले करत अहेत. एकंदरीत सर्वच दहशतवाद्यांचा नायनाट दोन्ही देशांनी संयुक्तपणे करावा, अशी अपेक्षा आता चीनचे परराष्ट्र मंत्री लीन जीन यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. 
 

Related Articles