पंतप्रधान मोदी, नड्डा, राजनाथ स्टार प्रचारक   

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांची यादी बुधवारी जाहीर झाली. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध प्रमुख नेत्यांचा समावेश केला आहे.  महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि अन्य राज्यांतील नेत्यांना भाजपने स्टार प्रचारक बनविले आहे. 
 
स्टार प्रचारकांच्या यादीत प्रदेशाध्यक्ष जे. पी. नड्डा, राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, प्रमोद सावंत, छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णू देव साय, मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विनोद तावडे, नारायण राणे, चंद्रकांत पाटील, रामदास आठवले, चंद्रशेखर बावनकुळे, अशोक चव्हाण, आशिष शेलार, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, डॉ. विजय कुमार गावीत, अतुल सावे, धनंजय महाडीक, रावसाहेब दानवे, स्मृती इराणी, ज्योतिरादित्य शिंदे,  पियूष गोयल, के. अण्णामलाई, रवी किशन, अमर साबळे, अनुराग ठाकुर, शिवराज सिंह चौहान, सम्राट चौधरी, भजन लाल शर्मा, भुपेंंद्र पटेल यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीचा ते प्रचार करणार आहेत.

Related Articles