गुजरातमध्ये आजारी सिंहिणीचा मृत्यू   

अमरेली : गुजरातमधील अमरेली जिल्ह्यात एका सिंहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सिंहिणीने यापूर्वी दोन वन अधिकार्‍यांसह तिघांवर हल्ला केला होता. गेल्या काही दिवसांपासून ती आजारी होती. उत्तरीय तपासणीनंतर तिच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे अधिकार्‍यांनी सांगितले. सुमारे १२ वर्षांची ती होती. जाफराबाद तालुक्यातील मिटीयाला गावात सिंहिणीने चार दिवसांपूर्वी तिघांवर हल्ला करून त्यांना जखमी केले होते.यानंतर सरपंचांना ती आजारी आणि दुर्बल अवस्थेत आढळली होती. तिच्यावर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला आहे.

Related Articles