काँग्रेसचा लढा आसुरी शक्तीच्या विरोधात : राहुल   

नवी दिल्ली : काँग्रेस ’द्वेषाने भरलेल्या आसुरी शक्ती’च्या विरोधात  लढत आहे, असे राहुल गांधी यांनी सांगितले.मुंबई येथे इंडिया आघाडीच्या नुकत्याच झालल्या सभेत राहुल यांनी हिंदू धर्मात एक शक्ती असून आम्ही त्याविरोधात लढत असल्याचे सांगितले होते. त्यांच्या वक्तव्यामुळे देशात असंतोष निर्माण होईल, असा इशारा भाजपने दिला होता. आता राहुल यांनी स्पष्ट केले की, काँग्रेस ’आसुरी शक्ती’ च्या विरोधात लढत आहे.
 
राहुल यांनी सत्तेतील सुप्त शक्तीविरोधात लढा सुरू असल्याचे सांगितले होते. त्यावरून वाद निर्माण झाला होता. मोदींनी तेव्हा प्रत्येक आई आणि मुलगी हे शक्तीचे स्वरूप असल्याचे सांगितले होते. ते त्यांच्या सुरक्षेसाठी लढतील. आपल्या प्राणांची आहुती देतील, असेही ते म्हणाले होते.  त्यावर राहुल यांनी सांगितले की, मी धार्मिक शक्तीबद्दल बोलत नसून अराजकता, भ्रष्टाचार आणि लबाडी करणार्‍या आसुरी शक्तीबद्दल बोललो होतो.

Related Articles