नवनीत राणा यांना अमरावतीतून भाजपचे तिकीट   

नवी दिल्ली : भाजपने बुधवारी लोकसभा निवडणुकीसाठी सातवी यादी जाहीर केली. त्यात महाराष्ट्रातील अमरावतीमधून नवनीत राणा यांना आणि कर्नाटकमधील चित्रदुर्गा मतदारसंघातून गोविंद करजोल यांना उमेदवारी दिली. मुंबईत जन्मलेल्या नवनीत कौर राणा राजकारणात येण्यापूर्वी अभिनेत्री होत्या. अनेक तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०१९ मध्ये त्या अमरावतीमधून खासदार म्हणून निवडून आल्या. गोविंद करजोल यांचा जन्म कर्नाटकातील विजापूर तालुक्यात झाला असून त्यांनी यापूर्वी उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीपद भूषविले आहे. ते मुधोळ मतदारसंघातूनही आमदार म्हणून निवडून आले आहेत. विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री ए. नारायण स्वामी यांच्या जागी त्यांना उमेदवारी दिली. 

Related Articles