काँग्रेस नेते हरकसिंग रावत यांना समन्स   

डेहराडून : काँग्रेस नेते आणि उत्तराखंडचे माजी कॅबिनेट मंत्री हरकसिंग रावत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कथित वन गैरव्यवहार प्रकरणात नव्याने समन्स बजावले आहे. त्यानुसार, रावत यांना २ एप्रिल रोजी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर होण्यास सांगितले आहे. याआधी, ईडीने रावत यांना २९ फेब्रुवारी रोजी चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले होते. मात्र, ते काही कामानिमित्त आपण हजर राहू शकत नाही, असे सांगत अवधी वाढवून मागितला होता. ईडीने ७ फेब्रुवारी रोजी रावत आणि अन्य काहींच्या ठिकाणांवर छापे घातले होते.  याच प्रकरणात ईडीने रावत यांची सून आणि काँग्रेसच्या माजी नेत्या अनुकृती गुसैन यांना समन्स बजावले होते. परंतु, त्यांनीदेखील चौकशीस जाण्याचे टाळले आहे. आता ईडीने रावत यांना नव्याने समन्स बजावले आहे. तसेच, २ एप्रिल रोजी डेहराडून येथील ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. ईडीने सुमारे सव्वा कोटींची रोकड, सोने, विदेशी चलन आणि काही कागदपत्रे जप्त केली आहेत.

Related Articles