पुण्यातील भविष्य घडवायचे आहे   

पुणे लोकसभेचे उमेदवार एकाच व्यासपीठावर
 
पुणे : मला पुण्याचे पन्नास, शंभर वर्षांचे भविष्य घडवायचे आहे. वाहतूक, कचरा, पाणी अशा महत्वाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायचे आहे. अशा प्रतिक्रिया देत पुण्यातील लोकसभेच्या उमेदवारांनी एकाच टेबलवर गप्पा मारत पुण्याच्या विकासाचा आराखडा मांडला.
 
लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. पुणे लोकसभेसाठी रिंगणात असलेले महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा प्रचारही जोरात सुरू आहे. निवडणुकांच्या दरम्यान आपणच कसे योग्य उमेदवार हे सांगताना दोन्ही बाजूचे उमेदवार एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसून येत असतात. मात्र, पुण्यात काल हे उमेदवार चक्क एकमेकांशी विकासाच्या गप्पा मारताना दिसले. पुणे लोकसभेच्या रिंगणात असलेले महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आणि सोबतच अपक्ष निवडणूक लढवू इच्छिणारे वसंत मोरे आणि सामाजिक कार्यकर्ते या वाडेश्वर कट्टा कार्यक्रमात सहभागी झाले होते. 
 
मुरलीधर मोहोळ म्हणाले, आमच्या अगोदर कामे सगळ्यांनी केली. आता पुढे काय करायचे हे बघावे लागेल. मला पुण्याचे ५०-१०० वर्षांचे भविष्य घडवायचे आहे. कारण पुढच्या पिढीने आम्हाला नाव नको ठेवायला की तुम्ही त्या काळात कमी पडला आहात. केंद्र सरकारच्या दृष्टीने इथल्या प्रश्नांवर विचार केला पाहिजे. म्हणजेच पुढील ५० वर्षांचा विचार आत करायला हवा. शहरातल्या राजकीय सामाजिक राजकीय जीवनात मी काम करतो. महापालिका महापौर, स्थायी समिती अध्यक्ष पाहता मला शहराचा आवाका माहित आहे. मी पुण्याच्या कानाकोपर्‍यात पोचलोय. पुण्याला सर्वोच्च स्थानावर घेऊन जायचे आहे. भाजपबरोबर राहून मला चांगले काम करता येऊ शकत असा विश्वास आहे. 
 
धंगेकर म्हणाले, राजकीय सामाजिक जीवनात काम करताना मी चौकट आखून घेतली नाही. सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत मी पोचलो. माझ्याकडे येणार्‍या प्रत्येक नागरिकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. पक्षाला वाटले की मी सामान्यांच्या अडचणी सोडवू शकतो. त्यामुळे पक्षाने माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याला बहुमान दिला. त्यांच्या लक्षात आले की पुणेकर यांना चांगले मतदान करू शकतात. म्हणून मला उमेदवारी दिली. लोकशाहीत देशाचा विकास झाला. पण केजरीवाल यांना जेलमध्ये पाठवले. काहींना पाठवता पाठवता पक्षात घेतले. अजित पवारांबाबत तेच झाले. अशोक चव्हाण यांनाही पक्षात ओढले. भयमुक्त राजकारण देशात सुरु आहे. लोकशाही टिकली, तर भीतीच्या वातावरणातून मुक्त होतील. तर सामान्यांचे प्रश्नही लवकर सुटतील.  
 
मी काळजावर दगड ठेवून निर्णय घेतला. पक्ष सोडला, पुणे शहरात मनसेची एक ताकद आहे. आधीपासून मनसेला चांगले मतदान आहे. एक चुकीचा अहवाल पक्षश्रेष्ठींकडे गेला. त्यामुळे मी बाहेर पडलो. एका शहराला दिशा देण्याचे काम मी करू शकतो. मी आधीपासून विरोधी पक्षातच आहे. मला ही निवडणूक पुणेकरांच्या प्रश्नांवर लढायची आहे. शहरात वाहतूक, पाणी, कचरा हे प्रश्न महत्वाचे असल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले आहे.
 

Related Articles