गीतारहस्य जयंतीनिमित्त व्याख्यान   

पुणे : ‘केसरी’ व टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे गीतारहस्य जयंतीनिमित्त  ‘गीतारहस्यातील भक्तिविचार’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई येथील रामनारायण रूईया स्वायत्त महाविद्यालयाच्या संस्कृत विभागप्रमुख डॉ. वैशाली दाबके  व्याख्यान देणार आहेत. 
 
शनिवार दि. ३० मार्च रोजी गीतारहस्य जयंती आहे. त्या दिवशी डॉ. दाबके यांचे सायंकाळी ६.३० वाजता ऑनलाईन व्याख्यान होणार आहे. श्रोत्यांना हे व्याख्यान https://www.youtube.com/c/TMV Sanskrit या यूट्यूब चॅनेवर ऐकता येणार आहे. 

Related Articles