बालगंधर्व रंगमंदिर आजपासून नव्या रूपात सज्ज   

पुणे : पुण्यातील सांस्कृतिक विश्वातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे बालगंधर्व रंगमंदिर. मात्र हे नाट्यगृह देखभाल दुरुस्तीसाठी गेल्या दीड महिन्यापासून बंद होते. बालगंधर्व रंगमंदिराचे देखभाल-दुरुस्तीचे काम पूर्णत्वास आले आहे. नव्या रूपातील बालगंधर्व रंगमंदिर आज (गुरुवार) पासून सुरू होणार आहे. आज दुपारी एक वाजता एका नाटकाचा प्रयोग नियोजित आहे. नव्या रूपातील व्हीआयपी रूम, नवी आसनव्यवस्था, रंगकाम, वातानुकूलित यंत्रणा बदलणे असे काम केले आहे. कलाकारांसह रसिकांना आता नव्या रूपातील बालगंधर्व रंगमंदिर पाहायला मिळणार आहे.
 
बालगंधर्व रंगमंदिरात गेल्या काही वर्षांपासून येथे जाणवणार्‍या सोयी-सुविधांच्या अभावाबद्दल कलाकारांनी, रसिकांनी अनेक तक्रारी केल्या. त्यानंतर प्रशासनाकडून हालचाली करण्यात आल्या आणि आता बालगंधर्व रंगमंदिरात मोठ्या गतीने देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात आली. हे काम पूर्णत्वास आले आहे. गुरुवारपासून बालगंधर्व रंगमंदिर सुरू होणार आहे. गुरुवारनंतर अनेक नाट्यसंस्थाचे नाट्यप्रयोग नियोजित आहेत. रंगमंदिरात व्हीआयपी रूमचे इंटेरिअर बदलण्यात आले आहे. वातानुकूलित यंत्रणा, रंगमंचावरील पडदे बदलणे, खुर्च्या बदलणे, रंगकामही करण्यात आले आहे. तसेच, नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारसमोरील जागेवर लॉन उभारण्यात येत आहे. विविध कलाकृतीही साकारण्यात येत आहेत.
 
याविषयी बालगंधर्व रंगमंदिराचे व्यवस्थापक राजेश कामठे म्हणाले, बालगंधर्व रंगमंदिरातील देखभाल-दुरुस्तीचे काम पूर्णत्वास आले असून, भवन विभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतर गुरुवारपासून नाट्यगृह पुन्हा सुरू होणार आहे. गुरुवारी दुपारी नाटकाचा प्रयोगही नियोजित आहे.
 

Related Articles