हैदराबादची विश्वविक्रमी खेळी   

हैदराबाद : मुंबईविरुद्ध हैदराबाद यांच्यात बुधवारी झालेल्या आयपीएलच्या पहिल्या फेरीतील सामन्यात हैदराबादच्या संघाने प्रथम फलंदाजी करत विश्वविक्रमी खेळी केली साकारली. फक्त ३ फलंदाज गमावत तब्बल २७७ धावा केल्या. तर विजयासाठी २७८ धावांचे आव्हान ठेवले.  हैदराबादच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांना चांगलेच चोपले.  या सामन्याची नाणेफेक ही मुंबईच्या संघाने जिंकली होती. मात्र मुंबईने हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादच्या सलामीवीरांपैकी ट्राविस हेड याने ६२ धावा तर अभिषेक शर्माने ६३ धावा आणि क्लासेन याने नाबाद ८० धावा करत संघासाठी  अर्धशतके साकारली. मयांक अगरवाल याने ११ धावा करत बाद झाला. मात्र हेड आणि अभिषेक शर्मा यांनी तगडी सलामी दिली. अ‍ॅडम मार्कराम याने ४० धावा केल्या त्याला साथ देताना हेनरीच क्लासेन याने मुंबईच्या गोलंदाजांना खरपुस समाचार घेतला.
 
रोहित शर्माने डेक्कन चार्जर्सकडून आयपीएलचे तीन हंगाम खेळल्यानंतर तो २०११ मध्ये मुंबई इंडियन्समध्ये दाखल झाला होता. रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्ससाठी सर्वात महत्वाचा खेळाडू आहे किंवा तो चाहत्यांचा खूप लाडका आहे का? या प्रश्नाचे उत्तर वेगळे असू शकते. मात्र मुंबईसाठी सर्वात यशस्वी खेळाडू आणि कर्णधार को असे म्हटले तर तो उत्तर फक्त आणि फक्त रोहित शर्मा असंच येतं. पुन्हा एकदा रोहित शर्मा एमआयची निळी जर्सी घालून मैदानात उतरला आहे. 
 
मात्र सनराईजर्स हैदराबादविरूद्धचा हा सामना रोहितसाठी नक्कीच खास आहे. तो या फ्रेंचायजीकडून २०० वा आयपीएलचा सामना खेळला आहे. रोहितच्या उपस्थितीत आणि नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने खूप मोठे यश पाहिले आहे. कधी कधी अपयशाचा देखील सामना केला आहे. रोहित खेळाडू म्हणून मुंबई इंडियन्ससोबतच वाढत राहिला.   रोहित शर्माची मुंबई इंडियन्ससोबतचा प्रवास आकडेवारीवरून सांगायचा झाला तर त्याने मुंबईकडून खेळताना ५०५४ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ही २९.३९ इतकी असून त्यात ३४ अर्धशतके आणि एका शतकी खेळाचा समावेश आहे. 
 

Related Articles