गुजरातचा कर्णधार शुभमन गिलवर दंडात्मक कारवाई   

चेन्नई : इंडियन सुपर लीग २०२४ स्पर्धेत गुजरात टायटन्स संघाला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पराभवाचा धक्का बसला. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातला ६३ धावांनी पराभूत व्हावे लागले. आयपीएल २०२४ मधील हा गुजरातचा पहिला पराभव आहे. मात्र, पराभवानंतर गुजरातला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. गुजरातचा कर्णधार शुभमन गिलवर १२ लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे. या सामन्यात गुजरातकडून षटकांची गती कमी राखली गेल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
 
आयपीएलने दिलेल्या माहितीनुसार गुजरात टायटन्सने आयपीएलच्या आचार संहितेतील नियमाचा भंग करण्याची ही १७ व्या आयपीएल हंगामातील पहिलीच वेळ आहे. त्यामुळे गिलवर कर्णधार म्हणून १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.नियमानुसार ९० मिनिटांच्या आत संघाला २० षटके पूर्ण करावी लागतात. षटकांची गती कमी राखल्याची चूक पहिल्यांदा झाल्यास कर्णधारावर १२ लाखांचा दंड ठोठावला जातो. तसेच दुसर्‍यांदा अशी चूक झाल्यास कर्णधारावर २४ लाखांचा दंड आणि प्लेइंग इलेव्हनमधील इतक खेळाडूंवर ६ लाख किंवा सामना शुल्काच्या २५ टक्के, जी रक्कम कमी असेल, तो दंड ठोठावण्यात येतो.
 तसेच तर हीच चूक तिसर्‍यांदा झाली, तर कर्णधाराला ३० लाखांचा दंड आणि एका सामन्याची बंदी अशी कारवाई केली जाते, याशिवाय संघातील खेळाडूंवर १२ लाखांचा किंवा सामना शुल्काच्या ५० टक्के, जी रक्कम कमी असेल, तो दंज ठोठावला जातो. यापुढील होणार्‍या चूकीसाठी हीच कारवाई कायम केली जाते. दरम्यान, हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सकडे ट्रेड केल्यानंतर गिलकडे गुजरातने कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे.
 

Related Articles