केजरीवालांच्या अटक प्रकरणात अमेरिकेने नाक खुपसू नये   

भारताने फटकारले

 
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटक प्रकरणात अमेरिकेने नाक खुपसू नये. हे प्रकरण भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यात ढवळाढवळ करु नका, अशा शब्दात भारताने अमेरिकेला फटकारले आहे. तसेच या प्रकरणी निषेध करण्यासाठी अमेरिकेच्या मुत्सुद्याला परराष्ट्र मंत्रालयात हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.
 
दिल्ली सरकारच्या मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने नुकतीच अटक केली होती. तसेच न्यायालयाने त्यांना ईडीची कोठडी दिली आहे. या प्रश्नी अमेरिकेच्या गृह विभागाने  निषेधाचा सूर आवळवला होता. प्रकरणाची पारदर्शक चौकशी व्हावी आणि निर्धारित वेळेत ते निकाली काढले जावे, असे वक्तव्य केले होते. त्याची दखल भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने तातडीने घेतली आहे. अमेरिकेच्या मुत्सुद्दी ग्लोरिया बेरबेना यांना या प्रकरणी हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.
 
अमेरिकेच्या गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याची विधानावर तीव्र आक्षेप आम्ही घेतला आहे. केजरीवाल यांचे प्रकरण भारताचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यात अमेरिकेने नाक खुपसण्याची गरज नाही. असे करून अमेरिकेने भारताच्या सार्वभौमत्वाला एकप्रकारे आव्हान देत आहे, अशा शब्दात कान उघाडणी केली आहे. भारतीय न्यायव्यवस्था स्वतंत्र, निष्पक्ष आहे. योग्य तो  निर्णय घेण्यास समर्थ आहे. योग्य वेळेत प्रकरण निकाली काढणारे आहे, अशा शब्दात अमेरिकेची कान उघाडणी भारताने केली आहे.
 

Related Articles