मावळातून संजोग वाघेरे यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाची उमेदवारी जाहीर   

पिंपरी : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज १७ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. त्यात मावळ मधून माजी महापौर संजोग वाघेरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले आहे. पंधरा दिवसांपूर्वी रायगड दौऱ्यावर असतानाच उद्धव यांनी मावळातून संजोग वाघेरे यांना विजयी करण्याचे आवाहन केले होते. आज वाघेरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली.
 
वाघेरे यांनी पिंपरी-चिंचवड शहराचे महापौरपद भूषविले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख होती.  २०१४ पासून लोकसभेसाठी ते इच्छुक होते मात्र २०१४ मध्ये राहुल नार्वेकर आणि  २०१९  मध्ये पार्थ पवार यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने वाघेरे यांची निवडणूक लढविण्याची संधी हुकली. तरीही राष्ट्रवादीतील फुटीनंतर वाघेरे यांनी अजित पवार यांच्यासोबत राहण्याची भूमिका घेतली होती. 
 
यावेळी महायुतीत निवडणूक लढविण्याची संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वाघेरे यांनी ठाकरे गटात प्रवेश  केला. त्याचवेळी त्यांना उमेदवारी मिळणार हे निश्चित झाले होते आज त्यावर शिक्कामोर्तब झाले
 

Related Articles