कोळसा उत्पादनात एक अब्ज टनाचा टप्पा पार   

नवी दिल्ली : मागील काही महिन्यांपासून भारतात कोळशाच्या उत्पादनात वाढ झाली आहे. भारताने कोळसा उत्पादनात १ अब्ज टनाचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे कोळसा आयातीवरचे अवलंबित्व कमी होणार आहे. भारत हा जगातील कोळसा उत्पादक देशांपैकी एक आहे. २०२०-२१ मध्ये कोळशाचे उत्पादन ७१६.०८ दशलक्ष मेट्रिक टन होते. त्यानंतर आता चालू आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भारताने मागील वर्षाच्या तुलनेत ९३७.२२ दशलक्ष टन कोळसा उत्पादन करत २५ दिवसांच्या फरकाने मागे टाकले आहे. 

Related Articles