असांजेला मृत्युदंड देणार नसल्याची हमी द्या   

लंडन : विकीलिक्सचा संस्थापक ज्युलिअन असांजेला मृत्युदंडाची शिक्षा देणार नाही, अशी हमी अमेरिकेने प्रथम द्यावी. त्यानंतर त्याला अमेरिकेला सोपविले जाईल, अशी भूमिका ब्रिटनच्या न्यायालयाने मंगळवारी घेतली आहे. अमेरिकेच्या लष्कराची  हजारो गोपनीय कागदपत्रे विकिलीक्सच्या माध्यमातून असांजेने सार्वजनिक केली होती. तो मूळचा ऑस्ट्रेलियाचा नागरिक आहे. तो सध्या लंडन येथील तुरुंगात आहे. असांजेला अमेरिकेकडे सोपवावे, अशी मागणी करणार्‍या अर्जावर ब्रिटनच्या उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायाधीश व्हिक्टोरिया शार्प आणि जेरेमी जॉन्सन यांनी सांगितले की, त्याला मृत्युदंड दिला जाणार नाही, अशी हमी जोपर्यंत अमेरिका देत नाही तोपर्यंत आम्ही त्याला अमेरिकेकडे सोपविणार नाही. 

Related Articles