युद्धबंदीसाठी इस्रायलसह हमासचाही नकार   

आंतरराष्ट्रीय दबाव झुगारला

 
रफाह (गाझा पट्टी) : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने सोमवारी रात्री उशिरा मुस्लिमांच्या पवित्र रमजान महिन्यात गाझामध्ये तात्काळ युद्धविराम करण्याची मागणी करणारा ठराव मंजूर केला. मात्र, हमासने हा नवीन प्रस्ताव नाकारला, तर इस्रायलनेहीे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या या ठरावावर संताप व्यक्त केला आहे.गाझामध्ये सहा महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. रक्तपात थांबवण्यासाठी सोमवारी उशिरा झालेल्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना दोन्ही देशांनी नकार दिला. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे की, इस्रायल हमासचा खात्मा करण्याचे आणि ओलिसांना परत आणण्याचे आपले उद्दिष्ट साध्य करू शकते. 
 
तर हमासने म्हटले आहे की, जोपर्यंत इस्रायल कायमस्वरूपी युद्धविरामास सहमती देत नाही, गाझामधून आपले सैन्य मागे घेत नाही तसेच दहशतवाद्यांसह शेकडो पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही.
 
गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या युद्धाने गाझा पट्टीचा बराचसा भाग उद्ध्वस्त केला आहे. त्यातील बहुतेक रहिवाशांना विस्थापित केले आहे. २.३ दशलक्ष लोकसंख्येपैकी एक तृतीयांश लोक उपासमारीच्या उंबरठ्यावर   आहेत. रूग्णालयातील नोंदी आणि मृतांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, रफाह येथील निवासी इमारतीवर सोमवारी उशिरा इस्रायली हल्ल्यात नऊ मुले आणि चार महिलांसह किमान १६ लोक मारले गेले.  
 

नेत्यान्याहू यांनी हमासच्या मागण्या फेटाळल्या  

 
युद्धविराम, गाझा पट्टीतून सैन्याची माघार आणि ओलिसांची अदलाबदल या हमासच्या मागण्या मान्य करणार नाही. दहशतवादी गटाची लष्करी आणि प्रशासकीय क्षमता नष्ट करण्यासाठी, तसेच उर्वरित ओलीसांची सुटका करण्यासाठी काम करत राहणार असल्याचे नेत्यान्याहू यांनी सांगितले. 
 

Related Articles