भाजपकडून नोकर्‍यांबाबत तरुणांची दिशाभूल : राहुल   

नवी दिल्ली : भाजपने दरवर्षी दोन कोटी नोकर्‍या देण्याचे आश्वासन देऊन तरूणांची दिशाभूल केल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी  केला. 
राहुल म्हणाले, भाजपने निर्माण केलेल्या भ्रमाचे जाळे तोडून युवकांनी स्वतःचे नशीब स्वतःच बदलायचे आहे. नरेंद्र मोदी तुमच्याकडे रोजगाराची काही योजना होती का? हा प्रश्न आज प्रत्येक तरुणाच्या ओठावर आहे. प्रत्येक गल्ली-बोळात भाजपच्या लोकांना विचारले जात आहे की, दरवर्षी दोन कोटी नोकर्‍या देण्याचे खोटे आश्वासन का दिले?
 
निवडणुकीपूर्वी युवकांना दिलेले वचन ’युवा न्याय’च्या माध्यमातून रोजगार क्रांती करण्याचा काँग्रेसने संकल्प केला आहे. आमची हमी आहे की, आम्ही सरकारमध्ये येताच आम्ही ३० लाख सरकारी पदे भरू, प्रत्येक सुशिक्षित तरुणाला वर्षाला १ लाख रुपयांची नोकरी दिली जाईल. कायदा करून पेपर फुटीपासून मुक्ती मिळवू. 
 
दोन्ही विचारसरणीच्या धोरणातील फरक ओळखण्याची हीच वेळ आहे. काँग्रेसला तरुणांचे भविष्य घडवायचे आहे आणि भाजपला त्यांची दिशाभूल करायची आहे. तरुणांना स्वत:च्या हाताने आपले नशीब बदलून या दोन विचारसरणीला सामोरे जावे लागेल. भ्रमाचे जाळे बाजूला करून देशात ’रोजगार क्रांती’ आणावी लागेल, असेही ते म्हणाले.
 

Related Articles