कंगनाविरोधात आक्षेपार्ह पोस्ट; श्रीनेत यांच्याविरोधात निवडणूक आयुक्तांकडे तक्रार   

नवी दिल्ली : अभिनेत्री आणि भाजपची उमेदवार कंगना राणावत हिच्यासंदर्भात आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत  यांच्याविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाने निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केली आहे. 
 
कंगना यांना दिलेली उमेदवारी आणि मंडी या शब्दांचा चुकीचा शब्द प्रयोग असलेली पोस्ट श्रीनेत यांनी समाजमाध्यमावर टाकली होती. श्रीनेत यांच्या वर्तनाची दखल घेऊन त्यांच्यावर त्वरित आणि कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी निवडणूक आयुक्तांना पत्र पाठवून केली आहे. दरम्यान, सुप्रिया श्रीनेत यांनी कथित आक्षेपार्ह मजकुराबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. आपण अशाप्रकारचा आक्षेपार्ह मजकूर कधीही प्रसारित करणार नाही. माझ्या नावाचा वापर करून दुसर्‍या खात्यावरून हा मजकूर प्रसारित करण्यात आला आहे.  यासंदर्भात मी एक्स (ट्विटर) कडे तक्रार केली आहे.

Related Articles