लुधियानाचा काँग्रेस खासदार भाजपमध्ये   

नवी दिल्ली : पंजाबमधील लुधियानातील काँग्रेसचे खासदार रवनीत सिंग बिट्टू यांनी मंगळवारी भाजपत प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपत प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी,  गृहमंत्री अमित शहा आणि सरचिटणीस विनोद तावडे यांनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. 
 
भाजपतील प्रवेशानंतर बिट्टू म्हणाले, गेल्या दहा वर्षांपासून पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा यांचे पंजाबवरील प्रेम मी पाहात आलो आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पंजाबमध्ये विकास कामे अधिक होतील, असा विश्वास वाटतो आहे. अन्य राज्ये ज्या प्रमाणे प्रगती करत आहेत. त्यात पंजाब का मागे राहावा ?, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. राज्यात दहशतवाद पसरला होता तेव्हा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शांततेसाठी मोलाचे प्रयत्न केले होते. त्यामुळे मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.

Related Articles