कुख्यात गुंड अन्सारीवर बांदा रुग्णालयात उपचार   

लखनौ : उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड आणि माजी आमदार मुक्तार अन्सारी याला मंगळवारी रुग्णालयात दाखल केले आहे. पोटात दुखत असल्याची तक्रार त्याने बांदा येथील तुरुंग अधिकार्‍यांकडे केली होंती.
 
मुक्तार अन्सारी याला बांदा येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. काल दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्याने पोटात दुखत असल्याची तक्रार अधिकार्‍यांकडे केली होती. त्यांचे बंधू आणि गाझीपूरचे आमदार अफजल अन्सारी यांनी सांगितले की, कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली.. मुक्तार यांचे वकील नसिम हैदर यांनी सांगितले की, मी त्याची भेट घेतली असून आता त्याची प्रकृती आता चांगली आहे.

Related Articles