पंतप्रधानांच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न   

पंजाबच्या मंत्र्यासह आपचे कार्यकर्ते ताब्यात

 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यानीं मोर्चा काढला. या वेळीं अनेकजणांन पोलिसंनी अटक केली. आपने या घटनची निंदा केली असून दिल्ली आता पोलिसांचे राज्य बनल्याची टीका केली. आपचे ज्येष्ठ नेते सोमनाथ भारती, दिल्ली विधानसभेचे उपाध्यक्ष राखी बिर्ला आणि पंजाबचे मंत्री हरज्योत सिंग बाईनस यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली होती. त्या अटकेच्या निषेधार्थ आपने मंगळवारी जोरदार निदर्शने केली. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाला घेराव घालण्यासाठी मोर्चा काढला होाता. इनकलाब जिंदाबाद, केजरीवाल जिंदाबादच्या घोषणा कार्यकर्त्यानी देत मोर्चा काढला. आपचे नेते गोपाल राय यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, राज्यात केंद्र सरकारने १४४ कलम लागू केले आहे. त्यामुळे दिल्ली पोलिस मय बनली आहे.
दरम्यान, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अनेक ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ केली आहे.
 

भाजपचे ५७ कार्यकर्ते ताब्यात

 अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यासाठी निदर्शने करणार्‍या भाजपच्या ५७ कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कार्यकर्ते फिरोजशहा कोटला स्टेडियमजवळ जमा झाले होते. तेथून ते दिल्ली सचिवालयाकडे मोर्चाने जात होते. पक्षाचा ध्वज त्यांनी हाती धरला होता, तसेच केजरीवाल लाज बाळगा,  केजरीवाल राजीनामा द्या, अशा घोषणा त्यांनी दिल्या. काही कार्यकर्ते सचिवालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर उभारलेल्या कठड्यावर चढण्याचा प्रयत्न करत होते.

 

Related Articles