गौरव गोगोई यांचा जोरहाटमधून उमेदवारी अर्ज दाखल   

जोरहाट : काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी मंगळवारी आसाममधील जोरहाट लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोराह, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देबब्रत सैकिया यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी पुलककुमार महंता यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर केला. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी गोगोई यांनी गुरुद्वारा रामगढिया सभा, देवल नामघर, कमलाबोरिया नामघर, ताराजन मशीद आणि जोरहाटमधील बोरभेटा बॅप्टिस्ट चर्च येथे आशीर्वाद घेतले. मी माझ्या आसाम राज्यातील शांतता आणि समृद्धीसाठी प्रार्थना केली असे गोगोई यांनी सांगितले. आसाममधील १४ लोकसभेच्या जागांसाठी तीन टप्प्यातील पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी जोरहाट लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे. परिसीमन कवायतीनंतर काझीरंगा असे नामकरण झालेल्या कालियाबोर मतदारसंघाचे विद्यमान खासदार गोगोई यांना यावेळी जोरहाटमधून उमेदवारी देण्यात आली. 

Related Articles