नकुल नाथ यांचा छिंदवाडातून अर्ज   

भोपाळ : काँग्रेस नेते नकुल नाथ यांनी मंगळवारी मध्य प्रदेशातील छिंदवाडा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचे त्यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी नऊ वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते.
 
माजी खासदार अलका नाथ आणि कुटुंबियांसह नकुल नाथ यांनी छिंदवाडा येथील निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे आपला अर्ज सादर केला. अर्ज भरण्यापूर्वी नकुलनाथ यांनी शहरातील हनुमान मंदिरात पूजा केली. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी फेरी काढली. ज्यात प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जितू पटवारी आणि विरोधी पक्षनेते उमंग सिंगर उपस्थित होते. 
 
मध्यप्रदेशातील लोकसभेच्या २९ जागांपैकी भाजपने २०१९ मध्ये छिंदवाडा वगळता २८ जागा जिंकल्या होत्या. भाजपने नकुल नाथ यांच्या विरोधात जिल्हा अध्यक्ष विवेक बंटी साहू यांना उमेदवारी दिली आहे. छिंदवाडा ही जागा काँग्रेसचा बालेकिल्ला असली तरी भाजप यावेळी ही जागा जिंकण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावत आहे.
 

Related Articles