सातार्‍यातून उदयनराजे लढणार   

नाशिकचा तिढा कायम

 
मुंबई : भाजपने सातारा लोकसभेसाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांचे नाव निश्चित केले असून, उद्या (गुरूवारी) जाहीर होणार्‍या भाजपच्या यादीत याबाबतची औपचारिक घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) सातार्‍याच्या जागेचा आग्रह सोडला असून, त्याबदल्यात नाशिकची जागा द्यावी, अशी मागणी पुढे केल्याने नाशिकचा गुंता सुटण्याऐवजी वाढला आहे.
 
सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी उदयनराजे भोसले आग्रही होते. यासाठी ते दिल्लीत ठाण मांडून बसले होते. अखेर चार दिवसांनंतर त्यांची भाजप नेते अमित शहा यांची भेट झाली. या भेटीनंतर मुंबईतही बरीच खलबते झाली. अखेर भाजपकडून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रणजीत नाईक निंबाळकर यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.
 

Related Articles