तर शिवतारेंशी संबंध तुटतील   

शिरसाट यांचा इशारा

 
मुंबई, (प्रतिनिधी) :  शिवसेना नेते विजय शिवतारे यांच्यावर कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत शिवसेना नेतृत्वाने दिले आहेत. उमेदवारी अर्ज भरेपर्यंत विजय शिवतारे यांचे मन वळविण्याचा आम्ही प्रयत्न करू. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्याशी चर्चा करतील. मात्र तरी देखील त्यांनी जर अर्ज भरलाच तर त्यांच्यासोबत आमचे नाते तुटलेले असेल. नेतृत्वाचे जर त्यांनी ऐकले नाही तर त्यांचे आणि आमचे संबंध संपतील, असे शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले आहे.
 
बारामती मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे विजय शिवतारे यांनी जाहीर केले आहे. महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार उभ्या राहणार आहेत. विजय शिवतारे देखील शिवसेनेत म्हणजेच महायुतीत आहेत. फाशी दिली तरी बेहत्तर मी निवडणूक लढविणारच असे शिवतारे म्हणाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील त्यांनी सातत्याने टीका केली आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनदा  शिवतारे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला आहे. अर्ज भरेपर्यंत त्यांची समजूत घालण्यात येईल. पण जर एवढे समजावूनही शिवतारे यांनी उमेदवारी अर्ज भरलाच तर त्यांचे आणि आमचे नाते तुटलेले असेल. नेत़त्वाचे जर त्यांनी ऐकले नाही तर त्यांचे आणि आमचे संबंध संपतील व तशी घोषणा आम्ही करू असे शिरसाट यांनी स्पष्ट केले.
 

Related Articles