शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शनाला हजारो विद्यार्थ्यांची भेट   

नारायणगाव, (प्रतिनिधी) : राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने नारायणगाव येथे शिवकालीन शस्त्रास्त्रे व विविध वस्तूंच्या प्रदर्शनाला सुमारे २,५०० विद्यार्थी व दोन हजार नागरिकांनी भेट दिली असल्याची माहिती प्रतिष्ठानचे  अध्यक्ष व उपसरपंच योगेश  पाटे यांनी दिली.पुणे जिल्ह्यातील  नारायणगावमध्ये तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जाते. शिवजयंतीनिमित्त प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास सर्वांना माहिती व्हावा यासाठी जुन्नरचे इतिहास अभ्यासक बापू ताम्हाणे यांनी संग्रहित केलेली त्या काळातील उपलब्ध असलेली दोन हजार वर्षांपूर्वीच्या सातवाहन काळातील विविध दुर्मीळ वस्तू, शिवकालीन विविध शस्त्रे, नाणी, दस्तावेज, भांडी, दगडी हत्यारे, अलंकार, खेळणी, कपडे अशा वस्तू, तसेच इतिहास अभ्यासक संतोष चंदने यांनी संग्रहित केलेली शिवकालीन विविध शस्त्रे ज्यामध्ये वाघनखे, तलवारी, भाले, बंदुका, तलवारी, कुर्‍हाडी, ढाली, चिलखत, अंकुश अशा संग्रहित वस्तूंना सुमारे ४ हजार ५०० जणांनी भेट देऊन पाहणी केली, अशी माहिती आयोजक निलेश दळवी यांनी दिली. 

Related Articles