उदयनराजेंविरोधात बिचुकले उतरणार लोकसभेच्या रिंगणात   

सातारा, (प्रतिनिधी) : सातारा लोकसभा मतदारसंघात महायुती  महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार निश्चित झालेला नाही. इच्छुकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपमध्ये या मतदारसंघात रस्सीखेच सुरू आहे.अशातच आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांनीही सातारा लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्धार केलाय. त्यामुळे सातारा शहरातून या मतदारसंघात आणखी एका उमेदवाराची भर पडली आहे.
 
देशाचे संविधान वाचविण्यासाठी आपण ही लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सातारा लोकसभेसाठी महायुती व महाविकास आघाडीचे कोण उमेदवार असणार याची उत्सुकता ताणली आहे. महायुतीकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्याचा शब्द केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी दिला. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नितीन पाटील इच्छुक आहेत. शिवाय, दुसरीकडे शिंदे गट शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनीही तयारी केली आहे. अशातच भाजपकडून नरेंद्र पाटील हेही मैदानात उतरणार असे सांगत आहे.
 

Related Articles