अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक रद्द   

मुंबई : एक वर्षापेक्षा कमी कार्यकाळ बाकी असल्यामुळे उच्च न्यायालयाने अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोट निवडणूक रद्द केली आहे. न्यायधीश अनिल किलोर आणि न्यायधीश जवळकर यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत.
 
भाजप आमदार गोवर्धन शर्मा यांच्या निधनाने अकोला पश्चिम विधानसभेची जागा गेल्या काही दिवसांपासून रिक्त आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी काँग्रेसने पश्चिम मतदारसंघात साजिद खान पठाण यांना उमेदवारी जाहीर केली होती. तर भाजपकडून अद्यापही कोणताही उमेदवार मैदानात नव्हता. दरम्यान, या पोट निवडणुकीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अनिल शिवकुमार दुबे यांनी अर्ज दाखल केला होता. फक्त तीन महिन्याच्या कालावधीसाठी जनतेच्या पैशाचा अपव्यय का करता? असा सवाल त्यांनी निवडणूक आयोगाला केला होता. २६ एप्रिलला या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार होते. ४ जूनला निकाल लागणार होता, तर २८ मार्चला अधिसूचना जारी होणार होती. दुबे यांच्या अर्जावर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अकोला पश्चिम विधानसभा पोटनिवडणूक रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. 
 

Related Articles