परिमंडळ चारच्या हद्दीतून गुन्हेगार तडीपार   

येरवडा : लोकसभा पार्श्वभूमीवर पुणे पोलिस विभागाचे परिमंडळ चारच्या हद्दीतील पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांना तडीपार आणि हद्दीबाहेर हाकलण्यात आले आहे, असा आदेश पोलिस उपायुक्त विजय मगर काढला आहे. यासाठी सर्व वरिष्ठ पोलिस निरीक्षक आदेशाचे पालन करत आहेत.यामध्ये ज्या आरोपींवर खून, खुनाचा प्रयत्न खंडणी, दरोडा, दहशत, कोयत्या गॅँगमधील टोळी, महिलांना त्रास देणारे, अशा गुन्हेगारांना पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तडीपार आणि हाकलण्यात आले आहे. 
 
चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गणेश यमरण्या कुर्डेकरी, (वय २४, रा. पांडवनगर), सोमनाथ ऊर्फ सोम्या धोत्रे, (वय ४५, रा. वडारवाडी) यांना  तडीपार करण्यात आले आहे.येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तडीपार करण्यात आलेल्या आरोपींमध्ये हरजितसिंग ऊर्फ सोनू सरवजितसिंग सिद्धू (वय ४५, रा. नागपुर चाळ, येरवडा), विकास ऊर्फ महाराज भगत तौर (वय ३६, रा. लक्ष्मीनगर येरवडा), अजय श्वर, गणेश राठोड (वय २४ रा. जय अधिक जचाननगर, येरवडा), रूपेश दिलीप आडागळे (वय २४, रा. मनात जयप्रकाशनगर, येरवडा), शंकर मानू गणे बव्हाण (वय ५४, रा. पांडू ते लमाणवस्ती, येरवडा) यांना बाहेरचा रस्ता पोलिसांनी दाखविला आहे. 
 
विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बळीराम सुदाम पतंगे (वय २३, रा. जन खराडी), अरबाज असलम शेख (वय २२, रा. एसआरए बिल्डिंग, क विमाननगर), योगेश प्रकाश म्हस्के (रा. यमुनानगर, विमाननगर) यांना हद्दीबाहेर  काढले.लोणीकंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतून गौरव ऊर्फ महादू सातव (वय ३३. रा. आव्हाळवाडी ता. हवेली), महेंद्र संभाजी कुटे (वय ३८, रा. आव्हाळवाडी, ता. हवेली) या १२ जणांना पुणे, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.
 
निवडणुकीच्या दरम्यानही अजून तडीपार करण्याची कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिस उपायुक्त विजय मगर यांनी सांगितले. ही कारवाई पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सह आयुक्त प्रवीण पवार, अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. 
 

Related Articles