आशिया चषकात भारतविरुद्ध पाकिस्तान सामना   

डंबुला : आशियाई क्रिकेट परिषदेने महिला आशिया चषक २०२४ चे वेळापत्रक जाहीर केले. ही स्पर्धा १९ जुलैपासून सुरू होणार असून २८ जुलैपर्यंत श्रीलंकेतील डंबुला येथे खेळली जाणार आहे. स्पर्धेत ८ संघ सहभागी होणार आहेत. या संघांची २ गटात विभागणी करण्यात आली आहे.
 
भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. त्यांच्याशिवाय यूएई आणि नेपाळला या गटात ठेवण्यात आले आहे. बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया आणि थायलंड यांना ब गटात ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तान महिला संघाचा सामना नेपाळशी होणार आहे. दिवसाच्या दुसर्‍या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाचा सामना यूएईशी होणार आहे.
 
अध्यक्ष जय शाह म्हणाले की, महिला आशिया कप २०२४ या प्रदेशात महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी ची वचनबद्धता अधोरेखित करते. महिला क्रिकेटची वाढती लोकप्रियता आणि महत्त्व प्रतिबिंबित करणार्‍या संघांमधील वाढता सहभाग आणि स्पर्धा पाहून आम्ही उत्साहित आहोत.पुढे ते म्हणाले की, २०१८ मधील सहा संघांपासून २०२२ मध्ये ७ संघ आणि आता ८ संघांपर्यंतचा हा विस्तार झाला आहे, आणि हा महिला खेळ आणि आशियाई क्रिकेटमधील वाढत्या टॅलेंट पूलसाठी आमच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. आम्ही एका रोमांचक स्पर्धेची वाट पाहत आहोत जी खेळाडू आणि चाहते दोघांनाही प्रेरणा देईल.
 

 स्पर्धेचे वेळापत्रक

 
१९ जुलै: पाकिस्तान विरुद्ध नेपाळ
१९ जुलै : भारत विरुद्ध युएई
२० जुलै: मलेशिया विरुद्ध थायलंड
२० जुलै: श्रीलंका विरुद्ध बांगलादेश
२१ जुलै: नेपाळ विरुद्ध युएई 
२१ जुलै : भारत विरुद्ध पाकिस्तान
२२ जुलै: श्रीलंका विरुद्ध मलेशिया
२२ जुलै: बांगलादेश विरुद्ध थायलंड
२३ जुलै : पाकिस्तान विरुद्ध युएई
२३ जुलै: भारत विरुद्ध नेपाळ
२४ जुलै: बांगलादेश विरुद्ध मलेशिया
२४ जुलै: श्रीलंका विरुद्ध थायलंड
२६ जुलै: पहिली उपांत्य फेरी
२६ जुलै: दुसरी उपांत्य फेरी
२८ जुलै: अंतिम
 

दोन्ही गट खालीलप्रमाणे

अ गट: भारत, पाकिस्तान, यूएई, नेपाळ
ब गट: बांगलादेश, श्रीलंका, मलेशिया, थायलंड
 

Related Articles